Thursday, March 28, 2024
HomeदेशRSS दहशतवादी संघटना; राजरत्न आंबेडकरांची बंदीची मागणी

RSS दहशतवादी संघटना; राजरत्न आंबेडकरांची बंदीची मागणी

Rajratna Ambedkar,Rajratna, Ambedkar,RPI,Republican Party of India,Dr Babasaheb Ambedkar,Babasaheb Ambedkar,Babasaheb,Dr Ambedkarबेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही भारतातील दहशतवादी संघटना आहे. संघावर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

राजरत्न आंबेडकर म्हणाले, तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. आरएसएस ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत,’ असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला एक साध्वी बसली आहे आणि ती मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते, असंही ते म्हणाले.

आरएसएसकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब कुठून आले…

राजरत्न आंबेडकर यांनी सवाल केला, आरएसएसकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब कुठून आले? इतका दारुगोळा कुठून आला? बंदुका कुठून आल्या? पंतप्रधानांच्या बाजूला बसून या साध्वी असं वक्तव्य करतात. ज्या घरांमध्ये दारुगोळा सापडला, ती घरे किंवा त्या घरांमधील मुलं-माणसांना दहशतवादी म्हणणार नाहीत काय? ज्या संघटनेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे ती संघटना दहशतवादी नाही का? या संघटनेचं लोक दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनांवर जगात बंदी घालण्यात यावी. ते काम आम्ही करत आहोत, असंही राजरत्न म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments