Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईVIDEO : भाजपचे प्रवक्ते म्हणाले, 'साध्वी प्रज्ञासिंह’ मूर्ख!

VIDEO : भाजपचे प्रवक्ते म्हणाले, ‘साध्वी प्रज्ञासिंह’ मूर्ख!

Pragya Singh Thakur Madhu Chavan,Pragya Singh Thakur, Madhu Chavan,Pragya, Singh, Thakur, Madhu, Chavan,Pragya Thakur,Pragya Singhमुंबई : भाजपच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बद्दल त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांनी धक्कादायक विधान केलं. ‘त्या साध्वी मूर्ख आहेत. दुर्दैव आहे आमचं त्या आमच्या पक्षात आहेत’, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी केलं आहे. News18 Lokmat या वृत्तवाहिनीवर ‘बेधडक’ या कार्यक्रमात चर्चेदरम्यान मधू चव्हाण बोलत होते.

‘गांधींचा मारेकरी हिंदूच’, असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या CAA विरोधातल्या सभेदरम्यान म्हणाल्या होत्या. याविषयी चर्चा सुरू असताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचा उल्लेख आल्यावर मधू चव्हाण यांनी त्या आमच्या पक्षात आहेत, हेच दुर्दैव असल्याचं म्हटलं.

रॉलेट कायद्याशी  केली होती...

उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी (३० जानेवारी) पुण्यात CAA विरोधात बोलताना सुधारित नागरिकत्व कायद्याची (CAA) तुलना रॉलेट कायद्याशी  केली होती. CAA रौलेट अॅक्टशी तुलना योग्य आहे का? याविषयी चर्चा सुरू असताना साध्वींचा विषय निघाला होता. त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी असा पवित्रा घेतला.

‘ब्रिटीशकालीन भारतात रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जायचा. CAA सुद्धा काळा कायदा आहे’, असं उर्मिला मातोंडकर पुण्याच्या सभेत म्हणाल्या होत्या. या सगळ्यावर News18 Lokmat वर चर्चा सुरू असताना भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर  मधू चव्हाण यांनी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी असे उद्गार काढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments