Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याहम होंगे कामयाब!...संजय राऊतांचा ट्विटरवरून सूचक इशारा!

हम होंगे कामयाब!…संजय राऊतांचा ट्विटरवरून सूचक इशारा!

SANJAY RAUT
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांवर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांनी वेळ दिला नाही. त्यानंतर राऊत यांनी हम होंगे कामयाब… असं राऊत यांनी टि्वट केलं. आमचाच विजय होईल असा सूचक इशारा दिला. याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. तर दुसरीकडे संध्याकाळी शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं. सत्तास्थापण्यासाठी सोमवारी राज्यपालांना वेळ मागितला पंरतु राज्यपालांनी तो नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राऊत यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून आम्ही यशस्वी होणार असल्याचं म्हटलं. यामुळे आज मंगळवारी काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी दुपारी राऊत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समर्थनाचे वेळेत पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. मात्र, संजय राऊत यांनी रुग्णालायतूनच ट्विट केलं आहे.

काय आहे राऊतांच टि्वट…

“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’

-बच्चन.

हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…”

असं ट्विट करत राऊत यांनी शिवसेनेनं सत्ता स्थापन करण्यातून अजून हार मानलेली नाही. असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments