Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊत डिस्चार्ज नंतरही म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

संजय राऊत डिस्चार्ज नंतरही म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

sanjay raut says , chief minister will be only from shiv sena
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या छातीमध्ये त्रास होत होता. सोमवारी रात्री राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे असा पुनरुच्चार माध्यमांशी बोलताना केला.

राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आलं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी राऊत यांची भेट घेतली होती. आज तिस-या दिवशी राऊत यांनी डिस्चार्ज मिळालं. डिस्चार्ज पूर्वी राऊत यांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली होती.

राऊत निकालाच्या दुस-या दिवसापासून दररोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर तोफ डागत होते. तसेच शरद पवारांशीही त्यांची भेट होत होती. त्यामुळे शिवसेना भाजपासोबत जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अस सरकार स्थापन होणार आहे. याची कल्पना असल्यामुळेच राऊत वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा दावा करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments