Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही : संजय राऊत

मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही : संजय राऊत

NCP MLAs locked up in Gurgaon Hotel by bjp: Sanjay Rautमुंबई : मध्यप्रदेशात भाजपने केलेल्या ऑपरेशन लोटसवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसांपूर्वीच फसलंय. त्यामुळे मध्यप्रदेशचा लोटस व्हायरस महाराष्ट्रात येणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत ही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही भाजपच्या ऑपरेशन लोटसवर जोरदार टीका केली आहे. लोटस व्हायरस आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय. या व्हायरसशी आम्ही अनेकवेळा सामना केला. हा व्हायरस आम्ही कशापद्धतीने घालवला हे सर्वांना माहीत आहे. शंभर दिवसांपूर्वीच आम्ही हा व्हायरस महाराष्ट्रातून घालवलाय, अशी बोचरी टीका सामंत यांनी केली.

महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.

जय महाराष्ट्र

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments