Thursday, March 28, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांचा भाजपवर टि्वटर हल्ला; जिनके घर...!

संजय राऊतांचा भाजपवर टि्वटर हल्ला; जिनके घर…!

shivsena sanjay raut troll bjp on twitterमुंबई: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे भाजपवर हल्ले सुरुच आहेत. आज सोमवारी राऊतांनी भाजपावर ट्विटरवरून हल्ला चढविला. “शेठ, जिनके घर शीशे के होते हैं वह दुसरो के घर पत्थर नहीं फेंका करते” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तावाटपावरून फारकत झाली. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षांसोबत महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही मिळालं तरी सुध्दा शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांवर आरोप,प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, भाजपवर हल्ला करण्याची एकही संधी शिवसेना खासदार राऊत सोडत नाहीत.

शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडण्यात शिवसेनेकडून राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. यामुळे राऊतांची सर्वत्र चर्चा होत आहेत.

भाजपाचं अल्पमतातलं सरकार चार दिवसांत कोसळल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आलं तरी सुध्दा, राऊत यांनी आपली ट्विटची मालिका सुरूच ठेवली आहे. शायरीच्या माध्यमातून राऊत विरोधकांवर हल्ले करत आहेत.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून शेर पोस्ट करत विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments