Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार आणि संजय राऊतांचा ‘या’ तारखेला सामना

शरद पवार आणि संजय राऊतांचा ‘या’ तारखेला सामना

Sanjay Raut will interview Sharad Pawar on December 29 in Pune
Image : TET

नागपूर : विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोघे नेते चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतरच राऊत शांत झाले. मात्र आता राऊत शरद पवारांची पुण्यामध्ये २९ डिसेंबरला प्रकट मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या सामनाकडे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी मुलाखती बाबत माध्यमांना माहिती दिली. शरद पवार यांची मी नेहमीच भेट घेत असतो. काही भेटी राजकारणापलिकडच्याही असतात. असं राऊत म्हणाले. या पूर्वीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची माहिती घेतली होती. ती मुलाखत चांगलीच गाजली होती.

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात ज्या दोन नेत्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, ते पवार आणि राऊतच पाहुणे आणि मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केल्यानंतर राऊत कोणत्या विषयांवर पवारांना बोलतं करणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. सत्तास्थापनेमागील काही गुपितं आणि किस्से उलगडले जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळ्या मंचावर जाहीर मुलाखत घेतलेली आहे. त्यामुळे राऊत कोणते प्रश्न विचारणार, संजय राऊत शरद पवारांना गुगली टाकणार, की शरद पवारच राऊतांना ‘क्लीन बोल्ड’ करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यामुळे सर्वांच्या नजरा या मुलाखतीकडे लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments