Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासंस्कृत श्लोक शिकवा आणि बलात्कार थांबवा; राज्यपालांचा अजब सल्ला

संस्कृत श्लोक शिकवा आणि बलात्कार थांबवा; राज्यपालांचा अजब सल्ला

Sanskrit ‘shlokas’ dissuade people from rape Bhagat Singh Koshyari
Image : TOI

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजब दावा केला. राज्यपालांच्या या दाव्याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवायला हवेत, असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. विद्यापीठ प्रशासनाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला कोश्यारींनी दिला. मुलांना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक समजवून सांगत होते. हे लोक आपलं ज्ञान, शक्ती आणि पैशाचा कसा वापर किंवा गैरवापर करतात, याविषयी कोश्यारी बोलत होते.

दुर्जन लोक महिलांवर बलात्कार करतात…

एक काळ असा होता की घराघरात मुलींची पूजा केली जात असे. तुम्ही सर्वजण धार्मिक आहात आणि घरी देवाची उपासना करत असाल, पण आता देशात काय होत आहे? दुर्जन लोक महिलांवर बलात्कार करतात आणि त्यांना जीवे मारतात. पॉवर म्हणजे एखाद्याला घाबरवणे, धमकावणे किंवा त्यांचं संरक्षण करणं? म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवावेत, जेणेकरुन अशा घटना घडू नयेत.’ असं कोश्यारी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments