Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याहोय, शरद पवार जाणते राजेच, आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

होय, शरद पवार जाणते राजेच, आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार

Udyan Raje Bhosale Pawar Awhad,Udyan, Raje, Bhosale, Pawar, Awhad,Udyan Raje, Sharad Pawar,Jitendra Awhad,Udyan Raje Bhosale,Jitendraसातारा : भाजपच्या भगवान गोयलांच्या पुस्कावरून वाद सुरु आहे. मात्र, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. असं म्हणत उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. उदयनराजेंच्या या टीकेचा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. ‘‘होय शरद पवारचं जाणता राजा आहेत’’. असं आव्हाडांनी व्हिडीओव्दारे उदयनराजेंना ठणकावून सांगितलं.

काय म्हणाले गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड…

‘होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न…प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,’ असं म्हणत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी… ‘महिलांना ३०  टक्के आरक्षण, असे किती प्रकल्प सांगू. त्यामुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे,’ असंही डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments