Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरअखेर शिर्डी बंद मागे, ग्रामसभेत निर्णय

अखेर शिर्डी बंद मागे, ग्रामसभेत निर्णय

Shirdi Bandh Sai Baba,Shirdi Bandh, Sai Baba,Shirdi, Bandh, Sai, Baba,Ahmednagarअहमदनगर : साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. मात्र शिर्डी ग्रामसभेच्या बैठकीत आज मध्यरात्री १२ वाजेपासून बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शिर्डी ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकीनंतर पुढची दिशा ठरवली जाईल असा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे आज रविवारी दिवसभरापासून शिर्डी मध्ये बंद पुकारण्यात आला होता. त्या बंदमध्ये बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या, साई मंदिर सुरू होते. वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली.

सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. दिवसभर बंद नंतर रात्री ८ वाजता बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाथरी ही साईजन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री मागे घेत नाहीत तोपर्यंत रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. भाविक आपल्यासाठी देवच आहे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाथरीला निधी देण्यास विरोध नाही… 

पाथरीला निधी देण्यास विरोध नसून त्याचा साई जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे, अन्य आठ जन्मस्थळाच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे ग्रामसभेत सांगण्यात आले.

तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक

या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस शिर्डी आणि पाथरीमधील संबंधितांना बोलाविण्यात आले आहे. शिर्डीच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी मध्यममार्ग काढावा, अशी मागणी सर्व संबंधितांनी केली आहे. शिर्डी बंद मागे घेण्याची विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असली तरी ती फेटाळून लावण्यात आली.

शिर्डीकरांची भूमिका कोणाच्या विरोधात नाही राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डीकरांची भूमिका कोणाच्या विरोधात नाही, परंतु ज्या लोकांनी बेछूट आरोप करीत मुक्ताफळे उधळली त्या प्रवृत्तींचा मी जाहीर निषेध करतो. शिर्डीत बंदला माझे पूर्ण समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केले.

राधाकृष्ण विखे पाटील राजकारण करत आहेत…

सध्याच्या घडीला श्रद्धा आणि सबुरी हाच मंत्र आहे. “साईबाबांनी सर्व भक्तांना एक मंत्र दिला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी संकट आणि प्रश्न निर्माण होतात. त्या त्या वेळी साईंचे भक्त त्यांच्या चरणी माथा टेकवतात आणि त्यांचा मंत्र समजून घेतात. तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा. आजच्या प्रसंगाला देखील तेच उत्तर असेल.” परंतु राधाकृष्ण विखे पाटील यावरून राजकारण करत आहेत. अशी भूमिका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments