Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकेंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संपात शिवसेनेचाही सहभाग

केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी संपात शिवसेनेचाही सहभाग

Sanjay Raut Bhartiya kamgar sena,Sanjay, Raut, Bhartiya, kamgar, sena,Sanjay Raut, Bhartiya kamgar senaमुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशातील कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपात शिवसेनेची भारतीय कामगार सेना सहभागी होणार आहे. शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे या संपात सहभागी होणार आहे.

आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, देशभरातील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही सोबत आहोत. देशात उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. शिवसेना कामगारांच्या पाठिशी असून हा संप यशस्वी ठरेल असेही त्यांनी म्हटले.

दिल्लीत ३० सप्टेंबर २०१९ रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या झालेल्या अधिवेशनात या संपाची हाक देण्यात आली होती. राज्यात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने या संपाची तयारी व नियोजन सुरू होते. शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनादेखील या कृती समितीचा घटक आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपात शिवसेना आणि भारतीय कामगार सेना सक्रिय सहभाग नोंदवणार आहे.

आंदोलनात या संघटना- पक्ष सहभागी होणार…

कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या संपात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, घर बांधकाम कामगार, महापालिका कामगार आदी क्षेत्रातील, आस्थापनांतील कामगार सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments