Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ‘या’ निवडणुकाही एकत्र लढणार

शिवसेना,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ‘या’ निवडणुकाही एकत्र लढणार

Shiv Sena, Congress-NCP will fight this election together Balasaheb Thoratनागपूर : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. आता तिन्ही पक्ष आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात पत्रकारांशी बातचीत करतांना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील जिथे शक्य असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील.असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही झालं तरी आघाडीचा विजय होणं हे आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं थोरात म्हणाले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्ग यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील महिनाभरात आमच्या तीन ही पक्षातील संवाद आणि बैठका लक्षात घेता, आम्ही चांगल्या प्रकारे सरकार चालवू. तसंच सर्वसामान्य जनतेला निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments