Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या 'या' पदाधिकार्यावर विक्रोळीत गोळीबार

शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकार्यावर विक्रोळीत गोळीबार

Shiv Sena leader Chandrashekhar Jadhav shot in Vikhroliविक्रोळी : शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर जाधव (वय 55) यांच्यावर  गुरुवारी सकाळी मुंबईच्या विक्रोळी भागात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ह्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे सातच्या सुमारास जाधव आपल्या मुलांसह विक्रोळीच्या टागोर नगर मधील साई मंदिरात जात असताना ही घटना घडली.

विक्रोळी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जाधव हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. हल्लेखोरांनी जाधव यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या, त्यातील एका गोळीने त्याच्या डाव्या खांद्याला लागली. जाधव यांना विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हल्लेखोरांना नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्ल्यात वापरलेली पिस्तूलही ताब्यात घेण्यात आली आहे.

अभय सिंह (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळ उत्तरप्रदेशचा रहिवाशी. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि घडल्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, जाधव यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments