Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबजरंग दलाच्या कार्यकर्त्याची शिवसैनिकांकडून हजामत

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची शिवसैनिकांकडून हजामत

Hiramani Tiwari Bajrang dal,Hiramani, Tiwari, Bajrang,dalमुंबई : दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते हिरामणी तिवारी यांनी उध्दव ठाकरेंविरोधात फेसबूक पोस्ट टाकली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी तिवारी यांची धुलाई करुन हजामत केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बजरंगदलाच्या हिरामणी फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मुंबईच्या वडाळ्यातील तिवारी यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावेळी सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी शिवसैनिकांकडून जीवे मारण्याचा धोका व्यक्त करत गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, सध्या तिवारीला मारहाण केल्याचीच चर्चा सुरु आहे. परंतु कायदा हातात घेणा-या शिवसैनिकांवर पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments