Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूरशिवसेनेचा भगवा रंग काँग्रेसच्या रंगात रंगला : नितीन गडकरी

शिवसेनेचा भगवा रंग काँग्रेसच्या रंगात रंगला : नितीन गडकरी

Nitin Gadkari said Two and a half years for CM post was not decided

नागपूर : शिवसेना भगवा रंग भासवत असून ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे. अशी  घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर केली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीससाठी प्रचारसभेत गडकरींनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

शिवसेनेने विधानसभा निकालानंतर भाजपने सत्तेचा वाटा दिला नाही म्हणून भाजपापासून फारकत घेतली होती. त्यामुळे भाजपची मंडळी शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बोलताना गडकरी म्हणाले, शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी ही भूमिका घेतली.

सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. शिवसेनेने भगव रंग असल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असाही आरोप गडकरी यांनी केला आहे. गडकरींच्या या विधानाचा शिवसेना कसा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments