Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रदणका : श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द!

दणका : श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द!

Shripad Chidam,Shripad, Chidamमुंबई : दोन वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद राज्य सरकारने आज शुक्रवारी (२८ फेब्रवारी) रद्द केले. छिंदम हा भाजपच्या उपमहापौरपदी असताना त्याने कृत्य केले होते. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवून तो निवडून आला होता.

दोन वर्षापूर्वी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमने एका कामाबाबत पीडब्लूडीचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला हद्दपार करण्यात आलं होतं.

श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली. छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं. त्यानंतर त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने आज छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले.

अपक्ष निवडणूक लढली होती…

अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधून छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या श्रीपाद छिंदमने दोन हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. ज्या भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली, त्याच पक्षाचा उमेदवार प्रदीप परदेशीचा त्याने पराभव केला. त्यामुळे छिंदमने सर्व मतदारांचे आभारही मानले.

माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments