Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना : पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi Ram Mandir,Narendra Modi, Ram Mandir,Narendra, Modi, Ram, Mandirनवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीकाम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आणि भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या कायद्यांतर्गत अधिग्रहण केलेली सर्व ६७ एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थश्रेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते पुढे म्हणाले.

आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माझ्या सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मस्थळावर भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्याबाबत एक विशाल योजना तयार केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापन करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्वायत्तपणे करणार काम…

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य आणि दिव्य राम मंदिर उभारणीच्या कामाबाबत निर्णय घेण्यास स्वायत्त असेल, असे पंतप्रधान म्हणाले. सखोल विचार करून, तसेच चर्चेअंती ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याची विनंतीही उत्तर प्रदेश सरकारला करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली.

‘हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, बौद्ध, पारसी, जैन एकाच कुटुंबातील’

भारतात राहणारे हिंदू असोत, मुस्लीम असोत, शीख, ईसाई, बौद्ध, पारसी किंवा मग जैन असोत, हे सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत, असे मोदी म्हणाले. या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याचा विकास व्हावा, ते सुखी राहावेत, देशाचा विकास व्हावा याच भावनेने माझे सरकार ‘सबका साथ, सबका विश्वास’ या मंत्रावर चालत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments