Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्यासिध्दीविनायकाचं दर्शन ‘पाच' दिवस बंद

सिध्दीविनायकाचं दर्शन ‘पाच’ दिवस बंद

Siddhivinayak Darshan closed for 'five' daysमुंबई : सिध्दीविनायक मंदिर दर्शनासाठी पाच दिवस बंद राहणार आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार नाही. या कालावधीत श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळं श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. २० जानेवारी रोजी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहितीही न्यासातर्फे देण्यात आली.

२५ जानेवारीपासून १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सिध्दीविनायकाच्या मंदिरात माघ श्रीगणेश जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी माघ गणेश जयंती महोत्सवाआधी श्री गणेशाच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येते. या वर्षी १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान श्रींच्या मूर्तीवर सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळं या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे, अशी माहिती श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments