हैदराबाद एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी

- Advertisement -

hyderabad four accused in hyderabad rape and murder case killed in encounter with policeहैदराबाद येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. तिला जाळून मारणारे ४ आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले. या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी तेलंगण सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत हे करणार आहेत. या प्रकरणात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवारी हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांविरोधात हैदराबाद एन्काउंटर हे बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर तेलंगणच्या केसीआर सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रचकोंडाचे पोलीस आयुक्त भागवत यांच्या नेतृत्वाखील तयार झालेली टीम एन्काउंटरच्या सर्व बाजूंचा बारकाईने तपास करणार आहे.

एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांचा जबाब नोंदवणार…

- Advertisement -

एसआयटीचे सदस्य एन्काउंटरबाबत साक्षीदार कोण आहेत हे पाहणार असून उपलब्ध होणाऱ्या साक्षीदारांचा जबाब नोंदवणार आहेत. या व्यतिरिक्त एसआयटी या वादग्रस्त एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचीही चौकशी करेल. या वादग्रस्त एन्काउंटर प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही सक्रिय झाला आहे. शनिवारी आयोगाच्या टीमने हैदराबादला येत चौकशी केली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या टीमने महेबूब नगरच्या शासकीय रुग्णालयाचाही दौरा केला. इथेच एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या ४ आरोपींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

- Advertisement -