Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईझवेरी बाजारात हिरे व्यापा-याची पंधराव्या मजल्यावरून आत्महत्या

झवेरी बाजारात हिरे व्यापा-याची पंधराव्या मजल्यावरून आत्महत्या

Diamond Merchant,Diamond, Merchantमुंबई : मुंबईतल्या झव्हेरी बाजार परिसरातील प्रसाद चेंबर्स या व्यावसायिक इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन हिरे व्यापा-याने उडी घेऊन आयुष्य संपवलं. धीरेन शाह (६१) असं आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी टॉवरवरुन उडी मारण्यापूर्वी धीरेन शाह यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. तसेच शाह यांची सुसाईड नोटही पोलिसांना त्यांच्या डेस्कवर सापडली.

शाह आपल्या कुटुंबासमवेत दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू नेपियनसी रोडवर राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शाहांच्याच व्यवसायाची परदेशातील जबाबदारी तो सांभाळतो.

टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचं सांगितलं…

डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक असलेल्या धीरेन शाह यांचं प्रसाद चेंबर्सच्या सर्वात वरच्या म्हणजेच पंधराव्या मजल्यावर कार्यालय आहे. धीरेन शाह नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या कार्यालयात आले. सकाळी ९.४० ते ९.५० च्या सुमारास आपण इमारतीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात आहोत, असं काही कर्मचाऱ्यांना सांगितलं. मात्र काही मिनिटांतच त्यांनी टेरेसवरुन उडी घेतली.

इमारतीवरुन खाली पडल्यानंतर धीरेन शाह यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

मुलगा अमेरिकेत…

त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो, कौटुंबिक व्यवसायाची परदेशी व्यापारातील काळजी घेऊन. शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि कुटुंबीयांचे जबाब पोलिस नोंदवणार आहेत.

काय आहे सुसाईट नोटमध्ये…

‘आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये’ असं शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments