Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमुख्य बातम्यानाराजीनाट्य : पुणे काँग्रेस कार्यालय कार्यकर्त्यांनी फोडले  

नाराजीनाट्य : पुणे काँग्रेस कार्यालय कार्यकर्त्यांनी फोडले  

Supporters of Congress MLA attack party office in Pune

पुणे : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे विस्तार सोमवारी थाटामाटात संपन्न झाले. मात्र, त्यानंतर नाराजीनाम्याला ऊत आले. भोर वेल्हा मुळशीचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात जोरदार राडा केला. शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारा विरुध्द पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाला आणि महाविकास आघाडीच्या एकूण ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र ज्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही असे अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नाराजीनाट्यावर आज मंगळवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यावर पडदा पडला. तोच ही पुण्यातली घटना घडली. संग्राम थोपटे यांनी मंत्रिपद न मिळाल्याने हे कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी शिवाजीनगर येथील शहर काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली.

काँग्रेस सहसचिव कीर्ती भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही चौघे जण कार्यालयात होते. यावेळी पक्षाचे शहर प्रवक्ते रमेश अय्यर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर आणि कर्मचारी पोपट पाटोळे हे तिघे बाहेर होते. वर्षाखेर असल्याने लवकर कार्यालय बंद करून निघणार होता. त्याचवेळी अचानक बाहेरून घोषणांचा आवाज आला. कार्यकर्ते निदर्शने करून निघून जातील असे वाटले होते. मात्र अचानक त्यांनी दगडफेक आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.

Pune Congres protest

शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, खिडक्या फोडल्या. दगड मारून टीव्हीही फोडला. मी घाबरून आतल्या छोट्या खोलीत जाऊन टेबल खाली लपले म्हणून मला दुखापत झाली नाही. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयांमधील काचा फोडल्या.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध केला. व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments