Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्यासत्तेच्या पेचप्रसंगातही 'सुप्रिया सुळेंना' पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी

सत्तेच्या पेचप्रसंगातही ‘सुप्रिया सुळेंना’ पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी

Supriya Sule is concerned about security of journalistsमुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीला पेच प्रसंग निर्माण झालं आहे. सर्व घटना घडमोडींच कव्हरेज करण्यासाठी माध्यमांध्येही स्पर्धा असते. त्यामुळे पत्रकार,कॅमेरामन धावपळ करतात. एक कॅमेरामनचं छायचित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वट केलं. आणि स्वतःची काळजी घ्या, असे भावनिक आवाहन केले आहे. या टि्वटनंतर सुप्रीया सुळेंनी व्यक्त केलेल्या काळजीचीच चर्चा सुरु आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेळात वेळ काढून पत्रकारांच्या सुरक्षेवरून एक ट्विट केले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो, ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या. हे ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांविषयी आपल्या मनात असलेली भावना व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे ट्विट केले आहे. हे ट्विटला रिट्विट केले जात असून याला लाइक्स मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments