Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादपक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रीया सुळेंचा कार्यकर्त्यांना दम

पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रीया सुळेंचा कार्यकर्त्यांना दम

supriya sule on bjp shivsena governmentऔरंगाबाद : पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दम दिला. ‘माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहे. पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे,’ अशा शब्दात सुळे यांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना दम दिला.

खासदार सुप्रिया सुळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पैठण येथे आज शुक्रवार (२१ फेब्रुवारी) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असतानाच राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत कार्यक्रमात गोंधळ घातला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने एकच गोंधळ झाला आणि उपस्थितांची धावपळ उडाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मध्येच भाषण थांबवावं लागलं. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, तरीही घोषणाबाजी सुरूच राहिली. उलट कार्यकर्ते राडेबाजीवर उतरल्याने सुळे प्रचंड संतापल्या आणि त्यांनी थेट गोंधळी आणि बेशिस्त कार्यकर्त्यांना दम दिला.

वाकचौरे गोर्डेंच्या कार्यकर्त्यांना निघून जाण्याचा सल्ला…

सुळे यांच्या या रौद्ररुपानंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर सुळे यांनी वाकचौरे आणि गोर्डे या दोघांनाही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून जायला सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत वाकचौरे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. पक्षाने गोर्डे यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे वाकचौरे समर्थक नाराज होते. मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे हा राडा झाल्या अशीही माहिती समोर आली आहे. मात्र, गोंधळ झाला नाही. अशी प्रतिक्रिया माजी आमदार संजय वाकचौरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments