Thursday, March 28, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती चिंताजनक

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती चिंताजनक

swati maliwal,Delhi women commissionनवी दिल्ली: हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर अत्याचाराच्या घटनेनंतर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत फासावर लटकवण्यात यावे, यासाठी कायदा करावा. या मागणीसाठी ३ डिसेंबरपासून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल उपोषणाला बसल्या होत्या. मात्र आज रविवारी पहाटे मालिवाल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या १३ दिवसांपासून स्वाती मालीवाल यांच उपोषण सुरु आहे. रविवारी पहाटे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच, उपोषण संपुष्टात न आल्यास मूत्रपिंडाला नुकसान पोहोचू शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता.

दिशा विधेयक लागून करण्याची पंतप्रधानांकडे मागणी…

शनिवारीच मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संपूर्ण देशात ‘दिशा विधेयक’ तातडीने लागून करपण्याची मागणी केली होती. तसंच महिला सुरक्षेबाबत केंद्राच्या उदासीन भूमिकाबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments