Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर

अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर

thackeray-government-releases-maharashtra-vikas-aghadi-ministers-portfolioमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. काही दिवसांपासून खाते वाटप कधी जाहीर होणार याचीच चर्चा होणार सुरु होती. अखेर आज गुरुवारी खातेवाटपाला मुहूर्त लागला.

शिवसेनेच्या वाट्याला गृह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्र शिक्षण या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ नियोजन, गृहनिर्माण आणि सार्वजनिक आरोग्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर बाळासाहेब थोरात महसूल, उर्जा खातं सोपवण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments