Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याठाणे ते पनवेल वातानुकूलित लोकल धावणार

ठाणे ते पनवेल वातानुकूलित लोकल धावणार

Thane to Panvel air-conditioned local will runमुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन केले जात आहे. काही दिवस चाचणी केल्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

मध्य रेल्वेवर चालवण्यात येणारी पहिली वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये येईल. या लोकलची बांधणी रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. वातानुकूलित लोकलमध्ये बारा डबे वातानुकूलित असणार आहेत. स्टेनलेस बॉडी, स्वयंचलित दरवाजे आणि मोठय़ा काचेच्या खिडक्या असणार आहे. तर एका डब्यातून दुसऱ्या डब्यात प्रवेश करता येणार येईल.

प्रवाशांना लोकलच्या गार्ड आणि मोटरमनशी संपर्क साधता यावा यासाठी डब्यात टॉक बॅक यंत्रणा असणार आहे. स्वयंचलित चेतावणी देणारी अलार्म यंत्रणेचा यामध्ये समावेश असणार आहे. दरवाजा न उघडल्यास प्रवासीही दरवाजा उघडू शकतील अशी व्यवस्था असणार आहे. तसेच डब्यात प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणेचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments