Thursday, March 28, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रकांत पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात फाटाफूट

चंद्रकांत पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात फाटाफूट

 Chandrakant Patil
भाजपने पुणे येथील कोथरुड मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात दोन गटांमध्ये फाटाफूट झाली आहे.

ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमदेवारीवरू विरोध दर्शविला होता. मात्र, आता अचानक त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. ब्राम्हण महासंघाच्या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन दिले.
चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी परस्पर ते पत्रक काढलं आहे. याबाबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तसंच परस्पर पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येईल असंही कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे सध्यातरी चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments