Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यसभेत 'हे' विधेयक मंजुर करण्यासाठी एनडीएकडे बहुमत

राज्यसभेत ‘हे’ विधेयक मंजुर करण्यासाठी एनडीएकडे बहुमत

दिल्ली: राज्यसभेत सत्ताधारी भाजपकडे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी पूर्ण बहुमत नसले तरी विधेयक संमत करण्यासाठी एनडीएकडे संख्याबळ असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. राज्यसभेत हे विधेयक बुधवारी मांडण्यात येणार आहे.

बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. बुधवारी विधेयक मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत सध्या भाजपकडे ८३ सदस्य आहेत. याशिवाय, अण्णाद्रमुक (११), बिजू जनता दल (७), जनता दल (सं) (६), तेलंगण राष्ट्रीय समिती (६), वायएसआर काँग्रेस (२) याशिवाय, नियुक्त सदस्य १२ असे १२७ संख्याबळ होते. बहुमतासाठी १२० मते लागतील. विरोधकांकडे सुमारे १०० संख्याबळ आहे. त्यामुळे हे विधेयक राज्यसभेत मंजुर होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments