Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसे आणि भाजपची युती होऊ शकत नाही : एकनाथ खडसे

मनसे आणि भाजपची युती होऊ शकत नाही : एकनाथ खडसे

Eknath Khadse Raj Thackeray,Eknath Khadse, Raj Thackeray,Eknath, Khadse, Raj, Thackeray,MNS,BJP

मुंबई : महाराष्ट्र नवर्निमाण सेना (मनसे) हा प्रांतवाद मांडणारा पक्ष आहे. भाजप हा व्यापक विचारधारा असलेला पक्ष आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होऊ शकत नाही. असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भाजप आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी खोडून काढली आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होणार नाही. परंतु काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकीमुळे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (गुरुवार २२ जानेवारी) एकदिवसीय महाअधिवेशनाला सुरुवात  झाली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नवा झेंडा लाँच करण्यात आला आहे. मनसेला अपयश आल्यामुळे मनसे आपल्या भूमिकेत बदल करणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे १४ वर्षानंतर मनसे पक्षाचा झेंडा बदलला आहे. पक्षाचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

मनसेचा नवा झेंडा लाँच करण्यात आला. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला. मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड संघटनेनं यावर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे महाराष्ट्र नवर्निमाण सेना ( मनसे ) वादात अडकली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments