Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘या’ रेल्वेस्थानकांचे रुपडे पालटणार

‘या’ रेल्वेस्थानकांचे रुपडे पालटणार

Mumbai Railway Station,Mumbai,Railway Station,Charni Road Railway Station,Marine Lines Railway Station,Grant Road Railway Station,Railway Station,Railway,Stationमुंबई: मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिणी. वाढती प्रवाशी संख्या आणि जुन्या रेल्वेस्थानकांना गतवैभव प्राप्त करण्यासाठी रेल्वेने पाऊले उचलली आहेत. पश्चिम रेल्वेवरील स्थानकांचा कायापालट होणार आहे. विशेष म्हणजे ग्रॅंट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन या रेल्वेस्थानकांचा यामध्ये समावेश आहे.

तिन्ही रेल्वेस्थानकांना गतवैभव मिळवून देण्यासाठी लवकरच त्यांच्या कामाची सुरुवात होणार आहे. ग्रॅंट रोड स्थानकासाठी ५.३१ कोटी रुपये, चर्नी रोड स्थानकासाठी ३.७४ कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. पहिल्या टप्प्यात या दोन स्थानकांमध्ये काम होणार आहे तर मरीन लाइन्स स्थानकाचे काम दुस-या टप्प्यात होणार आहे.

चर्नी रोड स्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. या स्थानकावरून दररोज ५१ हजार ८५५ प्रवासी प्रवास करतात. या स्थानकालाही नवीन लूक दिलं जाणार आहे. हे रेल्वेस्थानक १८६७ मध्ये सुरु करण्यात आले होते. येथील रेल्वेस्थानकाच्या तिकीटाची जागा बदलण्यात येणार आहे.

ग्रॅंड रोड स्थानक हे १८५९ मध्ये बांधण्यात आले होते. या स्थानकावर चार प्लॅटफार्म आहेत, तर तीन पादचारी पूल आहेत. या स्थानकातून दररोज ७७ हजार प्रवासी प्रवास करतात. या स्थानकाला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. स्थानकातील आसनांची व्यवस्था, चहा स्टॉल जुन्या काळातील दिसतील त्या पध्दतीने डिझाईन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments