Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशदिल्लीत काँग्रेसच्या ह्या नेत्यांनी हातात घेतला झाडू

दिल्लीत काँग्रेसच्या ह्या नेत्यांनी हातात घेतला झाडू

Vinay Mishra Ram Singh Netaji AAP,Vinay, Mishra, Ram, Singh, Netaji, AAP,Vinay Mishra, Ram Singh Netaji AAP,Vinay Mishra AAPनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामांना ऊत आला आहे. दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन नेत्यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा हात सोडून आपमध्ये प्रवेश करून हातात झाडू घेतला.

कॉंग्रेसचे दोन नेते रामसिंग नेताजी आणि विनय मिश्रा दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी (आप) मध्ये सोमवारी दाखल झाले आहेत. आपचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘आप’ मध्ये प्रवेश केला.

विनय मिश्रा हे कॉंग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचे पुत्र आहेत. तर रामसिंग नेताजी हे माजी आमदार आहेत. रामसिंग नेताजी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ‘आप’ सरकारने केलेल्या कामांमुळे ते प्रभावित झाले असल्याने त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे नेताजी म्हणाले.

1998, 2003, 2008 आणि 2013 च्या निवडणूकीत निवडून आलेले काँग्रेसचे चार-टर्मचे आमदार प्रल्हादसिंग सावनी ही काही दिवसांपूर्वी आपमध्ये सामील झाले होते. गेल्या आठवड्यात दिल्लीतील कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते शोएब इक्बाल आपमध्ये सामील झाले. शोएब इक्बाल हे मटिया महाल विधानसभेचे पाच वेळा आमदार असून राजधानीत कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की ”आपचे धोरण आणि दिल्ली सरकारच्या कामांचा प्रभाव असल्याने लोक कॉंग्रेस सोडत आहेत. आम आदमी पार्टीमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आहे.”  येत्या 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची निवडणुक होणार आहे तर 11 फेब्रुवारीला निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक आपसाठी  महत्वाची मानली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments