Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगर‘हे’ काँग्रेस आमदार म्हणाले माझा आवडता पक्ष शिवसेना

‘हे’ काँग्रेस आमदार म्हणाले माझा आवडता पक्ष शिवसेना

Zeeshan Siddique,Zeeshan, Siddique,Zeeshan Siddiqui,Avadhoot Gupte

अहमदनगर : काँग्रेस पेक्षा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवडतो की, शिवसेना असा प्रश्न काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना झीशान सिद्दीकी यांनी माझा आवडता पक्ष काँग्रेस आहे. परंतु मला शिवसेना पक्ष आवडतो.

संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार झीशान सिद्दीकी यांनी उत्तर दिलं.

आमदार झीशान सिद्दीकी म्हणाले आदित्य ठाकरे आणि माझी मैत्री जुनी आहे. आम्ही जुने मित्र आहोत. मी माझे भाग्य समझतो माझ्या मतदारसंघात ‘मातोश्री’ निवासस्थान आहे. शिवसेनेचे जुने नेते आहेत. त्यांचही मार्गदर्शन मला मिळेल. मी लहान वयापासून वडील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच काम बघत होतो. ते रात्रं दिवस लोकांसाठी काम करतात त्यामुळे नेहमीच माझी इच्छा होती आपणही जनतेसाठी काम करावं आणि मी निवडणूक लढावी. त्यानंतर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करत होतो त्यामुळे मला तिकीट घेतांना त्रास झाला नाही. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी मला मदत केली.

तुमच्या वडिलांचे बॉलीवूडशी चांगले संबंध आहेत. तुमच्या मनात अभिनेता व्हावं असा प्रश्न कधी आला नाही का? असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी विचारला. त्याला उत्तर देतांना आमदार झीशान सिद्दीकी म्हणाले मी कधीही तसा विचार केली नाही. घरात सर्व राजकीय वातावरण असल्यामुळे राजकारणात जनतेची सेवा करावी असं निश्चित केलं होतं. त्यामुळे मी राजकारणात काम करत आहे. असंही आवर्जुन आमदार झीशान सिद्दीकी यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments