Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशसलग सहा दिवस बँका राहाणार बंद!

सलग सहा दिवस बँका राहाणार बंद!

नवी दिल्ली : आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद होत्या. बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. मात्र, त्यानंतरही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं कर्मचारी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात हा बंद असणार आहे.

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बँक कर्मचारी तीन दिवसांचा संप पुकारणार आहेत. ११ मार्च २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान कर्मचाऱ्यांनी संपाचा कालावधी निवडला आहे. १४ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १५ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत. तसेच दहा मार्च रोजी होळी असल्यामुळे बँकांना सुट्या असणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग सहा दिवस बँकांची दारे बंद राहणार आहेत. या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकते. एटीएममध्ये पैशांचा तुडवडा पडू शकतो. त्यामुळे शक्यतो सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेची सर्व कामे पूर्ण करावीत.

बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक कर्मचारी संघटना (AIBEA) यांच्याकडून संपाला दुजारा देण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सर्व राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचाऱ्यांकडून ११ मार्च ते १३ मार्च २०२० दरम्यान संप पुकारण्यात येईल.

या आहेत मागण्या ?

इंडियन बँक असोसिएशनकडून संपाची हाक…

कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments