Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरअवधूत गुप्ते ‘या’ युवा आमदारांच्या घेणार मुलाखती

अवधूत गुप्ते ‘या’ युवा आमदारांच्या घेणार मुलाखती

Aaditya Thackeray, Rohit Pawar,Aaditya Thackeray Rohit Pawar,Aaditya ,Thackeray,Rohit,Pawar,avadhoot gupte,avadhoot,gupte,Zeeshan, Siddique,Zeeshan Siddique,संगमनेर :  मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवार (१७ जानेवारी) रोजी सकाळी ११ वाजता संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या तरुण आमदारांच्या मुलाखती गायक, संगीतकार अवधूत गुप्ते घेणार  आहेत. ह्या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून होत आहेत. अशी माहिती माहिती संस्थेच्या विश्‍वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.

अमृतवाहिनीमधील भव्य क्रीडा संकुल व मेधा मैदानावर होत असलेल्या या युवा महोत्सवाचे जिल्ह्यातील व राज्यातील युवकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठे सांस्कृतीक व्यासपीठ असलेल्या मेधा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार (१६ जानेवारी) सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्‍वस्त सौ. शरयुताई देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संवाद तरुणाईंशी या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,  आदिती तटकरे, रोहित पवार,  धिरज देशमुख, ऋतुराज पाटील,  झिशान सिद्दकी या सर्व आमदारांच्या मुलाखती गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत. या कार्यक्रमातून तरुणांना प्रेरणादायी राजकीय वाटचाल व युवकांचे राजकारणातील महत्व याचा उलगडा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments