Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशशाहीनबागमध्ये ‘या’ पक्षाला लागला करंट

शाहीनबागमध्ये ‘या’ पक्षाला लागला करंट

Amanatullah Khan,Amanatullah, Khan,AAP Amanatullah Khanनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने गड कायम ठेवला. आपला ६२ जागा देऊन मतदारांनी एकहाती सत्ता दिली. तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला भोपळा दिला. मात्र, बटन असा दाबा की,शाहीनबागमध्ये करंट लागला पाहिजे असं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. परंतु शाहीनबागमध्ये आप ने बाजी मारली असून भाजपच्या उमेदवाराला करंट लागलं.

CAA आणि NRC विरोधाचं केंद्र झालेली शाहीनबाग ज्या विधानसभा मतदारसंघात येते त्या ‘ओखला’ मतदारसंघात कोणता पक्ष बाजी मारणार याची अनेकांना उत्सुकता होती. मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर काही काळ या मतदारसंघातून भाजप उमेदवाराने आघाडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कारण हा मतदारसंघ मुस्लीम बहुल भाग समजला जातो.

सध्या देशभरातील मुस्लीम समाजाचा एक मोठा भाग CAA आणि NRC कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनाचं केंद्र असेलेल्या शाहीन बागच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराने सुरुवातील आघाडी घेतली होती. मात्र नंतर हे चित्र पालटलं. या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे अमनतुल्लाह खान विजयी झाले आहेत.

मागील निवडणुकीत ओखला मतदारसंघातून आपच्या अमनतुल्लाह खान यांनी विजय मिळवला होता. तेच यंदाही या मतदारसंघातून आपचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात आप आणि काँग्रेसमध्ये मतांचं विभाजन झाल्याने सुरुवातीला भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याचं बोललं होतं. मात्र भाजपच्या उमेदवाराला ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवता आली नाही.

दरम्यान, २०१५ साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत ‘आप’ला दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या ३ जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments