Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदणका : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर टोल महागणार

दणका : मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर टोल महागणार

Wada-Bhiwandi toll closes after victim of young doctorमुंबई : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर १ एप्रिलपासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्या वाहनासाठी किती टोल?

कारसाठी सध्याचा टोल आहे २३० रुपये. १ एप्रिलपासून हा दर २७० रुपये होणार आहे.

मिनीबससाठी सध्या ३५५ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ४२० रुपये होणार आहे.

बससाठी सध्या ६७५ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ७९७ रुपये होणार आहे.

ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या ४९३ रुपये टोल आकारला जातो. १ एप्रिलपासून हा टोल ५८० रुपये होणार आहे.

क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या १५५५ रुपये टोल आकारला जातो. हा टोल १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका आकारला जाईल.

दर तीन वर्षांनी एक्सप्रेसवेवर १८ टक्के वाढ होणार…

पुढील १५ वर्षांसाठी मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. एमएसआरडीसीने नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. याआधी २०१७ मध्ये मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल १८ टक्क्यांनी महागले होते. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात १८ टक्के वाढ होईल अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ मध्येच काढण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments