Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूरउध्दव ठाकरे सोनियाचा पोपट; आशिष शेलारांची घणाघाती टीका

उध्दव ठाकरे सोनियाचा पोपट; आशिष शेलारांची घणाघाती टीका

Uddhav Thackeray Ashish Shelar,Uddhav Thackeray, Ashish Shelarनागपूर हिवाळी अधिवेशन दररोज या ना त्या कारणाने गाजत आहेत. विरोधक सत्ताधा-यांना धारेवर धरण्यासाठी विविध मुद्दे उकरुन गोंधळ घालत आहेत. भाजप आमदार विधानसभेतील मुख्य प्रतोद आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना डिवचले. भाजप आमदारांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ असा नारा आमदार शेलार यांनी दिला, त्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ असं म्हणत भाजप आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत घोषणाबाजी केली.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत भाजप आमदारांनी विधीमंडळाचं कामकाज रोखून धरण्याचा पवित्रा घेतला आहे. हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्या भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केल्या. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी घोषणाबाजी केली.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसऱ्या दिवशी भाजपने ‘सामना’तील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके संतापले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली होती. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्थी केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले होते.

आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून शेतकरी कर्जमाफी आणि कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे महत्वाच्या विषयांवर चर्चा होत नसल्याची सध्या चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments