Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याउध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 'हा' दिला कानमंत्र!

उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ‘हा’ दिला कानमंत्र!

Uddhav Thackeray meet at resort hosting NCP MLAsमुंबई : आपल्याकडे संख्याबळ आहे, आपण निश्चित बहुमत सिद्ध करू असं शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितले. काळजी करू नका, आपली युती बरीच पुढे जाईल. असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपआपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी या बैठकीसंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीस मार्गदर्शन केले.

या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थितीत होते. आपल्याकडे बहुमत आहे, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी आमदारांना दिला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयचा उद्या निकाल आहे, त्यानुसार पुढे काय करायचे हे ठरवले जाणार आहे. पण जर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आलीच तर निश्चितपणे संख्याबळ आपल्याबाजूने आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments