Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याउध्दव ठाकरे - अहेमद पटेल दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

उध्दव ठाकरे – अहेमद पटेल दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

uddhav thackeray met ahmed patel in hotel
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहेमद पटेल यांची रात्री मुंबईत एका हॉटेलमध्ये भेट घेतली. सरकारस्थापन करण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष सरकारस्थापन करणार जवळपास निश्चित झालं आहे. तिन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेच्या दृष्टीकोनातून कॉमन मिनीमम प्रोग्राम ठरवण्यासाठी बैठका सुरु आहेत. त्यादृष्टीकोनातून सर्व कार्यक्रम निश्चितीनंतर महाशिवआघाडी सत्तास्थापन करण्याची शक्यता आहे. कालच दिल्लीतील नेते आणि महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. सरकार बनवण्यासाठी त्याबाबत चर्चाही झाली.

मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपदे कोणत्या पक्षाला किती दिले जातील यावर चर्चा झाली. राज्यातील महापालिका, नगरपालिका व स्थानिक राज्यसंस्थामध्ये या तिन्ही पक्षांचा सहभाग कसा असेल याबाबतही उध्दव ठाकरे आणि अहेमद पटेल यांच्यात चर्चा झाली.

या चर्चेत सत्तेचा फॉर्म्यूला निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या वतीने सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय होईल, असं बोलले जात आहे.कालच दिल्लीतील नेते आणि महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. सरकार बनवण्यासाठी त्याबाबत चर्चाही झाली.

मुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रीपदे कोणत्या पक्षाला किती दिले जातील यावर चर्चा झाली. राज्यातील महापालिका, नगरपालिका व स्थानिक राज्यसंस्थामध्ये या तिन्ही पक्षांचा सहभाग कसा असेल याबाबतही उध्दव ठाकरे आणि अहेमद पटेल यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत सत्तेचा फॉर्म्यूला निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या वतीने सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय होईल, असं बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments