Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईउध्दव ठाकरे सरकारची शंभरी पार करुन अयोध्येला जाणार!

उध्दव ठाकरे सरकारची शंभरी पार करुन अयोध्येला जाणार!

Uddhav Thackeray will take oath as CMमुंबई : शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापन केल्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका त्यांच्यावर होत आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं वारंवार शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उध्दव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटव्दारे दिली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधी घोषणा केल्या प्रमाणे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. मार्चेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उध्दव ठाकरे हे मंत्री आणि खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीही ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की ‘मी पुन्हा अयोध्येला येईन’. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी ते अयोध्येत जावून रामललाचं दर्शन घेणार आहे.

संजय राऊत यांनी ही दिली माहिती…

सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा.

सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील. 

अयोध्येचा पहिला दौरा २ नोव्हेंबर २०१८…

उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०१८ रोजी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची चर्चा जोरात होती. निवडणुकीदरम्यान शिवसेना – भाजपमध्ये राजकीय संबंध देखील ताणले गेले होते. पण, लोकसभा निवडणुकीमध्ये युती केल्यानंतर शिवसेना – भाजपला राज्यात मोठं यश मिळालं होतं.

लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जात थेट भाजपला आव्हान दिलं होतं. नंतर भाजप आणि शिवसेनेच दिलजमाई झाली आणि राजकीय परिस्थिती बदलली. त्यावेळी मी पुन्हा अयोध्येत येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.

विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा उध्दव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments