Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशडोनाल्ड ट्रम्प 'या' तारखेला येणार भारतात

डोनाल्ड ट्रम्प ‘या’ तारखेला येणार भारतात

us president donald trump to visit india on february 24-25

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या (फेब्रुवारी)  महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसने याबद्दलची माहिती दिली असून ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला भारतात येणार आहेत. एक ट्विट करून व्हाइट हाऊसने म्हटले की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मलायना ट्रम्प २४-२५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भारतात येणार आहेत. या दौऱ्यामुळे अमेरिका-भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल असे म्हटले जात आहे.


१६ जानेवारीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली होती की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजित भारत दौऱ्यासाठी अमेरिका आणि भारत एकमेकांच्या संपर्कात आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘ट्रम्प भारतात येण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होत आहे. जेव्हा पीएम मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये याविषयी चर्चा सुरू झाली होती. याबद्दल सविस्तर माहिती मिळाल्यानंतर, ही माहिती आपणास कळवण्यात येईल.’

    कार्यक्रमाची रूपरेषा

    • सरदार पटेल मोटेरा स्टेडियमवर हा कार्यक्रम दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत चालणार आहे. मोदी-ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर विशेष संरक्षण पथकाचे (SPG) आयजी राजीव रंजन भगत यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
    • भगत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अहमदाबाद विमानतळावर उच्चस्तरीय बैठक पार पडली. अहमदाबादचे पोलिस आयुक्त आशिष भाटिया यांनी अधिकाऱ्यान समवेत दोन तास बैठक घेतली. यात सुरक्षेच्या योजना बाबद चर्चा झाली.
    • ‘केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमाव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प गांधीजींच्या साबरमती आश्रमाला हि भेट देण्याची शक्यता आहे. ते रस्त्याने आश्रमात जाऊ शकतात. त्यासाठी सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. यूएस सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी  2-3 दिवसात अहमदाबादला पोहोचतील.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments