Placeholder canvas
Friday, April 19, 2024
HomeकोंकणठाणेVideo डोंबिवली : मेट्रो पोलिटन कंपनीत दोन तासांपासून अग्निकल्लोळ!

Video डोंबिवली : मेट्रो पोलिटन कंपनीत दोन तासांपासून अग्निकल्लोळ!

Dombivli MIDC Fire,Dombivli, MIDC, Fire,Dombivli MIDC, Fire, MIDC Fire,Dombivli Fireडोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मेट्रो पोलिटन केमिकल कंपनीला आज, मंगळवार ( १८ फेब्रुवारी) दुपारी सव्वा एकला भीषण आग लागली. कंपनीत केमिकल आणि ऑईलच्या ड्रममध्ये स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ स्फोट झाले. त्यामुळं आग अधिकच भडकली. शेजारील कंपन्यांमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

दोन तासांपासून डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सुरुवातीला आगीची तीव्रता कमी होती. मात्र, त्यानंतर एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले. स्फोटांच्या आवाजानं परिसरात घबराट पसरली. काही वेळानं आग अधिकच भडकली. त्यामुळं या कंपनीसह आसपासच्या कंपनीतील कर्मचारी सुरक्षित ठिकाणी गेले. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप कळू शकले नाही. अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

आगीच्या तीन घटना…

रोल्टा कंपनीच्या कार्यालयाला  १३ फेब्रुवारी

मुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पुन्हा आग भडकली

माझगाव जीएसटी भवन       १७ फेब्रुवारी

VIDEO : मुंबईत जीएसटी भवनामध्ये अग्नितांडव, अजित पवार घटनास्थळी!

मेट्रो पोलीटीन कंपनी          १८ फेब्रुवारी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments