Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेVideo : जावडेकरांचे घुमजाव; केजरीवाल अतिरेकी आहेत असं म्हणालोच नव्हतो

Video : जावडेकरांचे घुमजाव; केजरीवाल अतिरेकी आहेत असं म्हणालोच नव्हतो

केजरीवालांबद्दल काय म्हणाले होते जावडेकर

Arvind Kejriwal Prakash Javadekar,Arvind Kejriwal, Prakash Javadekar,Arvind, Kejriwal, Prakash, Javadekarपुणे : ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी असून त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत असे मी बोललो नव्हतो,’ असा खुलासा केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शुक्रवारी (१४ फेब्रुवारी ) केला. मात्र, जावडेकरांनी ३ फेब्रुवारीला केजरीवालांवर आरोप केला होता. त्याबाबतचा एएनआयचा व्हिडिओ उपलब्ध आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दिशा’ अंतर्गत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. जावडेकर म्हणाले, ‘दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्यानंतर काँग्रेसची मते कोणत्या पक्षाकडे गेली हे माहीत नाही. भाजप हा शिकणारा पक्ष असून, या पराभवातून आम्ही शिकणार आहोत.’

जावडेकर ३ फेब्रुवारीला केजरीवालांना काय म्हणाले होते…

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी दहशतवादी असा उल्लेख केला होता. त्याचाच पुनरुच्चार करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा गंभीर आरोप आज केला होता. दरम्यान, जावडेकर यांच्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. केजरीवाल भाबडा चेहरा करून ‘मी दहशतवादी आहे का?’, असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर होय असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी निशाणा साधला.  केला होता. त्याचाच पुनरुच्चार करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा गंभीर आरोप आज केला. दरम्यान, जावडेकर यांच्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. केजरीवाल भाबडा चेहरा करून ‘मी दहशतवादी आहे का?’, असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर होय असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments