Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंनी शेअर केलेला हा Video बघितला का?

सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला हा Video बघितला का?

Video shared on social distancing by Supriya Suleमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची ताकद काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

करोनापासून वाचण्यासाठी सध्या सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले होते. पंतप्रधानांच्या याच विचाराला पुढे घेऊन जात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ शेअर करताना ‘चला सोशल डिस्टंसिंगची ताकद समजून घेऊया” असं आवाहन जनतेला केलं आहे.

या व्हिडिओत काय आहे संदेश…

एक कोरोनाबाधित व्यक्ती पाच दिवसांमध्ये २.५ लोकांना बाधित करु शकते. याप्रमाणे ती तीस दिवसांत ती ४०६ लोकांना बाधित करु शकते. जर या बाधित व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करुन लोकांशी ५० टक्क्यांनी संपर्क कमी केला तर पाच दिवसांत ती १.२५ लोकांना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ १५ लाकांना ती बाधित करु शकते.

जर या व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अधिक कडक अंमलबजावणी केली आणि लोकांशी ७५ टक्क्यांनी संपर्क कमी केला तर ती व्यक्ती ५ दिवसांत ०.६२५ लोकाना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ २.५ लोकांनाच या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधा होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments