Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअखेर विनायक मेटेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा

अखेर विनायक मेटेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा

Vinayak Mete Shiv Smarak,Vinayak Mete, Shiv Smarak,Vinayak, Mete, Shiv, Smarak,Chhatrapati Shivaji Maharaj Smarak,Chhatrapati Shivaji Smarak,Shivaji Maharaj Smarak,Shivaji Smarakमुंबई : विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनायक मेटे यांनी हा राजीनामा दिला आहे. भविष्यातही सरकारला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून विनायक मेटे हे २०१५  पासून काम पाहत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी ही समिती स्थापन केली होती. मेटे यांना समितीचं अध्यक्षपद दिलं होतं. मात्र, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्याने मेटे यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार राज्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारानुसार विकासाची कामे होणे अपेक्षित आहे.

Vinayak Mete resignation,Vinayak Mete, resignation,Mete resignation, Vinayak resignation

स्मारकाचं काम लवकरात लवकर होईल

शिवस्मारकाचं कामही उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसारच व्हायला हवं. त्यामुळे मी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असं मेटे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचं काम लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असून भविष्यातही सरकारला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments