Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याआपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, Thackeray, CM, Uddhavआपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे. पण न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरू आहे. नॉन-कोविड रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दवाखाने खुले ठेवा. सर्दी खोकला ताप असे कोणतेही लक्षण लपवू नका, कोणी आपल्याला वाळीत टाकण्याची भीती बाळगू नका, घरी उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्ध बरे होतात.

महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले. काल संध्याकाळपर्यंत ६६ हजार ७९६ टेस्ट केल्या, किमान ९५ टक्के निगेटिव्ह, ३६०० जणांना लागण, ३५० जण बरे, ७० ते ७५ टक्के अतिसौम्य किंवा लक्षण नसलेले. शत्रू दिसत असता, तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते, मात्र हा अदृश्य शत्रू आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो. ८० ते ९० टक्के जनतेपर्यंत रेशन पोहोचले,केंद्राची मदत होत आहे, केंद्र मोफत धान्य देत आहे पण फक्त तांदूळ आला आहे, तोही अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या जनतेसाठी, डाळ आणि गव्हाची मागणी केली आहे .महाराष्ट्र आणि मुंबई यातील आकड्यात काहीशी घट, पण इतक्यात भ्रमात राहायचं नाही, आकडे वरखाली होत राहतात,मी तपास करण्यास सांगितले आहे. अर्थचक्र रुतलं आहे,कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील काही उद्योगधंद्यांना परवानगी देणार, जिल्ह्यांतर्गत वाहतुकीलाअजूनही परवानगी नाही जिल्ह्यातच मालाची ये-जा करण्यास माफक परवानगी,आपण घरातच बसायचं आहे, पुणे -मुंबईत अद्याप वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यास संमती नाही.

घरात बसून कंटाळला असाल तर मुंबई महापलिका आणि बिर्ला – १८०० १२० ८२०० ५० आदिवासी विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई – १८०० १०२ ४०४० तसेच घरगुती हिंसा होत असेल तर १०० नंबरवर फोन करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments