Thursday, March 28, 2024
Homeमुख्य बातम्या'करोना'विरुद्ध; WHO कडून जागतिक आणीबाणीची घोषणा

‘करोना’विरुद्ध; WHO कडून जागतिक आणीबाणीची घोषणा

WHO Coronavirus,WHO, Coronavirus,Corona,virusवुहान : जगभरात फोफावू लागलेल्या ‘करोना’ या जीवघेण्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी जग सरसावलं आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) आणीबाणी घोषित केली आहे.

चीनमध्ये २१३ बळी घेऊन जवळपास १० हजार जणांना लागण झालेल्या करोनामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. चीनमधील यूबेई प्रांतातील वुहान शहरात मूळ असलेला ‘करोना’ विषाणू  हळूहळू जगभर पसरत आहे. अनेक देशांत ‘करोना’बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचं आवाहन केलं आहे. तर, काही देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर प्रवेशबंदी केली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आरोग्य संस्था असलेल्या ‘हू’नं सुरुवातीला ‘करोना’चा धोका मोठा नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, करोना’ला अटकाव करण्यासाठी जगभर आणीबाणी घोषित केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments