Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनमस्ते ट्रम्प खासगी संस्थेचा कार्यक्रम, सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी का? : काँग्रेस

नमस्ते ट्रम्प खासगी संस्थेचा कार्यक्रम, सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी का? : काँग्रेस

नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रमाचे आयोजन 'डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती'तर्फे

Randeep Surjewala Donald Trump,Randeep Surjewala, Donald Trump,Randeep, Surjewala, Donald, Trumpनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौ-यावर येत आहेत. त्या दौर्यापपूर्वी कॉंग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन तासांच्या कार्यक्रमांसाठी गुजरात सरकार १२० कोटी रूपये का खर्च करत आहे? मात्र, काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

कॉंग्रेसने विचारले आहे की ‘हाउडी मोदी सारखा ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आहे का? ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेत्यांना का आमंत्रित केले नाही ? असा सवाल कॉंग्रेसने केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष कोण आहे? असा प्रश्न देखील कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे हे आहेत सवाल…

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?, ट्रम्प यांना कधी आमंत्रित करण्यात आले आणि या आमंत्रणाचा स्वीकार त्यांनी कधी केला?, ट्रम्प का म्हणत आहे त्यांच्या स्वागतासाठी ७० लाख नागरिक उपस्थित राहणार आहे? कृपया मला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे द्या.

गुजरात सरकार १२० कोटी खर्च का करत आहे?

सुरजेवाला म्हणाले, एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या तीन तासांच्या कार्यक्रमांसाठी गुजरात सरकार १२० कोटी रूपये का खर्च करत आहे?

नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम जर ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर आयोजित केला असेल तर विरोधी पक्षातील नेत्यांना का बोलावले नाही? असा सवाल कॉंग्रेसने या पूर्वीदेखील उपस्थित केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले तो तर अभिनंदन समितीचा कार्यक्रम…

कॉंग्रेसने विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाने अजब उत्तर दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रमाचे आयोजन ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित करायचे याचा निर्णय पूर्णपणे समितीचा आहे.

कॉंग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ‘डोनाल्ड ट्रम्प सिटीझन अबोलिशन कमिटी’ च्या वतीने ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ते म्हणाले की समितीच्या सदस्यांचा निर्णय हा त्यांना आमंत्रित करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments