Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशदेशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा का नाही; राहुल गांधींचा सवाल

देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा का नाही; राहुल गांधींचा सवाल

Why not discuss the financial position of the country; Rahul Gandhi's questionनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ बनला आहे. यावरून संसदेत गदारोळ झाला. त्यानंतर खासदार राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ईशान्य भारत आगडोंब झालं आहे. यावरून लक्ष हटवण्यासाठी माझ्या भाषणावरून भाजप राजकारण करत आहेत. संसदेत देशाची पडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी यावरून चर्चा होत नाही. मी माझ्या त्या भाषणावरून माफी मागणार नाही. असं खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये आपल्या भाषणाचा पुन्हा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मेक इन इंडिया परंतु वर्तमान पत्र उघडले तर झारखंडमध्ये महिलेचा बलात्कार, उत्तरप्रेदशमध्ये महिलेवर बलात्कार नरेंद्र मोदींच्या भाजपच्या आमदाराने बलात्कार केला. एका पीडित तरुणीच्या गाडीचा अपघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चकार शब्दही काढला नाही. मोदी गप्प का आहेत. असा सवालही राहुल गांधी यांनी केला. हा मेक इंडिया नव्हे रेप इन इंडिया बनला आहे. परंतु, कॅब वरुन ईशान्य भारत पेटलेला आहे. त्यामुळेच लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपने हा विषय उकरून काढला आहे.

भारतीची विदेशात प्रतिमा मलिन झालेली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. देशात रोजगार नाही. बेरोजगारी वाढली. नवीन उद्योग नाही, गुंतवणूक नाही. जीडीपी घसरत चालला आहे. महागाई वाढत चाललेली आहे. देशाच्या परिस्थितीबाबत चर्चा होत नाही. भाजपची ज्या राज्यात सत्ता आहे त्या राज्यात कायद्याचा धाक उरला नाही. या बाबत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफि मागावी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीला रेपची राजधानी झाली असल्याचे सांगितले होते. त्याची क्लिप मी माझ्या ट्विटरवर टाकली आहे. मोदींनी देशाची माफी मागावी असा सवाल खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments