Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याचक्क निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीला इन्कम टॅक्सची नोटीस

चक्क निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीला इन्कम टॅक्सची नोटीस

ashok-Novel election commissioner wife income tax notice

नवी दिल्ली: देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल सिंघल लवासा यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. नोवेल यांनी भरलेल्या आयकर परताव्यासंदर्भातील काही तपशील विभागानं मागविले आहेत.

नोवेल या माजी बॅंकर आहेत. त्या किमान तीन कंपन्यांच्या संचालक पदावरही आहेत. ‘मी माझे सर्व कर वेळेवर भरले असून उत्पन्नाचं सर्व विवरण योग्य प्रकारे दिलं आहे,’ असं स्पष्टीकरण नोवेल यांनी दिलं आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना क्लीन चीट’ देण्यास होता आक्षेप

अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस पाच प्रकरणात अशोक लवासा यांनी मोदी आणि शहांना ‘क्लीन चीट’ देण्यास आक्षेप घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments